पुणे – करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बॅंक खात्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन नागरिक तसेच सामाजिक संस्थांना केले होते. यानुसार पुणे जिल्हा परिषदेचे वाघोली-आव्हाळवाडी गटाचे सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी आपले दोन वर्षांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
करोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू आहे. शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख, वाघोली-आव्हाळवाडी गटाचे सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनीही आपले दोन वर्षांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19 यामध्ये सदर रक्कम जमा होत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19, बचत खाते क्र. 39239591720, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023 शाखा कोड 00300, आयएफएससी कोड SBIN0000300 या खात्यात अनेक सामाजिक संस्था तसेच व्यक्तींनी शक्य तेवढी रक्कम जमा केली असून यामध्ये सर्वांनी शक्य तेवढे सहकार्य करावे, असे आवाहनही जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे.