येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे होणार निर्जंतूकीकरण
पुणे – महापालिकेचे डॉ. नायडू सांसर्गिक रूग्णालय राज्यभरातील करोनाग्रस्त रूग्णांच्या उपचाराचे केंद्र बनले आहे. यातून रूग्णालयात येणाऱ्या संशयित रूग्णांसह, डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गर्दीही वाढली आहे. त्यामुळे रूग्णालयात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे निर्जंतूकीकरण केले जात आहे. यासाठीचे “मिस्ट’ मशिन डॉ. नायडू रूग्णालयात बसविण्यात आले असून रूग्णालय आता 100 टक्के निर्जंतूक असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी
याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, अशा प्रकारची मशिन सध्या तुर्कस्थान मध्ये वापरण्यात येत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हारल झाल्यानंतर पालिकेनेही हे मशिन तातडीने उपलब्ध करून घेत नायडू रूग्णालयात बसविली आहे.
शहरात करोनाचे रूग्ण सापडल्यानंतर त्यांच्यावर उपचाराचे डॉ. नायडू सांसर्गिक केंद्र हे महत्वाचे केंद्र बनले आहे. शहरातील बाधीत व्यक्तींसह, परदेशातून तसेच पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील इतर जिल्ह्यातून या ठिकाणी करोनाच्या उपचारासाठी तसेच दररोज तपासणीसाठी दाखल होत आहे. त्यामुळे रूग्णालयातील गर्दी वाढली आहे. आता पर्यंत मास्क आणि सॅनिटायझर्स देऊन आत मध्ये घेतले जात होते. मात्र, संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हे “मिस्ट मशिन’ बसविले आहे. ते वापरण्यास सुरूवात करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले.
30 लाखाचे वॉशिंग मशिन…
नायडू रूग्णालयातील डॉक्टर तसेच परिचारकांची पुनर्वापराचे कपडे धुण्यासाठी तसेच निर्जंतूकीकरणासाठी पालिकेने दिल्लीहून तब्बल 30 लाख रूपये किमतीचे वॉशिंग मशिन मागविण्यात आले आहे. त्यामुळे रूग्णालयाच्या आवारातच आता कपडे धुण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. लॉकडाऊन असतानाही, दिल्ली येथील व्यावसायिकाशी संपर्क साधून तातडीनं हे मशिन मागविण्यात आले असून पुढील काही दिवसात ते दाखल होणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.