नवी दिल्ली : जगभरात करोनाचा संसर्ग आतापर्यंत १९५ देशांत पसरला असून पाच लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. २६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा या महामारीने बळी घेतला आहे. चीनच्या वुहान या शहरातून उद्भवलेल्या या कोरोना विषाणूने इटलीत कहर केला आहे. इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे.
एका दिवसांत इटलीमध्ये ९६९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आणखी २६ हजार नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. या महामारीने अमेरिकेतही आपली पायामुळे खोलवर रोवण्यास सुरुवात केली असून मागील २४ तासांत १८ हजार नवे रूग्ण तेथे आढळले आहेत.
इटलीत एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. इटलीमध्ये करोनानं एका दिवसांत ९६९ जणांचा बळी घेतला. या यादीत इटलीनंतर इराण आणि स्पेनचा क्रमांक लागलो. एका दिवसात इराणमध्ये ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर, स्पेनने ५६९ लोकांच्या मृत्यूची नोंद आहे. धक्कादायक बाब म्हणजे इटलीमध्ये आतापर्यंत करोनाच्या प्रदुर्भावामुळे ५१ डॉक्टरांचा समावेश आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, इटलीमध्ये एका दिवसांत ९६९ नागरिकांचा बळी गेला आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये एकूण ९१३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.