अमान (जाॅर्डन) – भारताचा अव्वल मुष्टियोध्दा अमित पंघाल याने शुक्रवारी 52 किलो वजनी गटात आशियाई आॅलिम्पिक पात्रता मुष्टियुध्द स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
अमित पंघाल याने मंगोलियाच्या एनखमनदाख खरखु यांचा 3-2 असा पराभव करत पुढील फेरीत आगेकूच केली आहे. आता, उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जर अमितने विजय मिळविला तर तो टोकियो आॅलिम्पिकला पात्र ठरणार आहे.
Amit Tested!
Experienced @Boxerpanghal pulled off a close win over Mongolian Enkhmanadakh Kharkhu with a split verdict (3:2) to reach the quarter-finals of the #OlympicQualifiers. 1⃣ step away from the #Tokyo2020 ticket. #PunchMeinHaiDum#boxing#Olympics pic.twitter.com/PP0CwKXjwj
— Boxing Federation (@BFI_official) March 7, 2020
दरम्यान, दुसरीकडे याच स्पर्धेत विकास कृष्ण यानेही 69 किलो वजनी गटात कर्गिस्तानच्या नूरू सुल्तान ममातोली यांचा 5-0 असा पराभव उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.