ल्यूसन – भारताची दुसऱ्या क्रमांकाची महिला ग्रँडमास्टर हरिका द्रोणावली हिने महिलांच्या फिडे ग्रांपि स्पर्धेमध्ये सलग दुसरा विजय नोदंविला आहे. तिने चौथ्या फेरीत रशियाच्या नाना झागनिंझेवर 27 चालीमध्ये मात करत विजय नोंदविला.
या विजयासह हरिकाच्या खात्यात तीन गुण जमा झाले आहेत. त्यानंतर आता हरिका स्पर्धेत अलेक्झांड्रा गोरियानचकीनाबरोबर संयुक्तपणे आघाडीवर आहे.
दरम्यान, याआधी हरिकाने गुरूवारी तिसऱ्या फेरीत 29 वर्षीय चीनच्या खेळाडून 54 चालींमध्ये विजय मिळविला होता. याआधी तिने दोन्ही फेरीत बरोबरी साधली होती.