नवी दिल्ली : दत्तक समारंभाचे पुरावे आणि पत्नीची परवानगी असेल तरच हिंदु दाम्पत्याचे दत्तकविधान वैध मानण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायलयाने स्पष्ट केले.
हिंदू दत्तक कायद्याचे कलम सात आणि 11 नुसार दोन महत्त्वाच्या अटी आहेत, याकडे न्या. एल. नागेश्वरा राव आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने लक्ष वेधले. पुरूषाने अपत्य दत्तक घेण्यापुर्वी पत्नीची परवानगी घ्यावी. मूल दत्तक घेताना आणि देताना केलेल्या समारंभाचे पुरावे असावेत, असा या अटी आहेत, असे न्यायालयाने नमूद केले.
एम. वनाजा यांनी एम. सरला देवी आणि कै. नरसिंहलू नायडू एस. यांची दत्तक मुलगी म्हणून जाहीर करण्यासाठी केलेली याचिका आंध्र प्रदेश उच्च न्यायलयाने फेटाळली. त्यात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायलयाने नकार दिला. वंजना यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांचे आई वडील लवकर मरण पावले. त्यांना त्यांची आजी घेऊन गेली. आजीने सरला देवी आणि त्यांच्या पतीकडे त्यांना सांभाळण्यासाठी दिले. सरला आणि त्यांच्या पतीने शाळा आणि महाविद्यालयात आई वडील म्हणून त्यांचे नाव नोंदवले आहे. या मुद्द्यावर तीने नायडू यांच्या सपत्तीवर हक्क सांगितला होता.
सरलादेवी आणि त्यांच्या पतीने त्यांना दत्तक घेतले होते, याचा पुरावा त्यांनी दिला नाही. सरला देवी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या पतीने तीला दत्तक घेतले नव्हते. तिला आपण वाढवण्यसाठी आणले होते असा दावा केला.
अर्जदाराच्या अज्जीनेही सरला आणि त्यांच्या पतीकडे तिला वाढवण्यासाठी सोपवले होते. त्यांनी तिला कधीही दत्तक घेतले नाही अशी साक्ष दिली होती.