रावणगावात तरुणाई, ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम
रावणगाव – पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यात 7 हजार लोकसंख्या असलेलं रावणगाव. हे गाव तेथे असलेल्या माकडांमुळे प्रसिद्ध आहे. गावाचे नाव रावणगाव असले तरी या ठिकाणी असंख्य माकडे आहेत. दरवर्षी माकडांची होणारी उपासमार पाहून ग्रामस्थ आणि तरुणांच्या पुढाकाराने 2 वर्षांपासून माकडांसाठी एक मूठ धान्य माकडांसाठी उपक्रम राबविला जात आहे.
काही शाळांमध्येही एक मूठ धान्य माकडांसाठी उपक्रम राबवून क्विंटलभर धान्य जमा केले जाते. ग्रामस्थांनी शिरसाई मंदिरात माकडांच्या खाण्याची सोय व्हावी म्हणून दानपेटी तयार केली आहे. दानपेटीतील रकमेतून आठवडे बाजारातून फळभाज्या विकत घेऊन बापूराव आटोळे हे माकडांसाठी अन्नधान्य, फळभाज्या देतात. मंदिर परिसर, मुख्य चौक, सरकारी दवाखाना परिसर आदी ठिकाणी माकडांचे वास्तव्य आहे.
गावात यापूर्वी गावात साधारण 500 च्या दरम्यान माकडांची संख्या होती. काही वर्षांपूर्वी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले. त्यावेळी माकडांचा मुख्य निवारा असलेले रावणगावच्या मुख्य चौकातील चिंचेचा महाकायवृक्ष तोडण्यात आला, तेव्हापासून गावातील माकडांची संख्या कमी झाली आहे. सध्या 150 माकडे गावात आहेत.
-बापूराव आटोळे,
वानरप्रेमी, रावणगाव.