वाल्हे – वाल्हे गावावर मागील काही वर्षांपासून जो काही निधींबाबतीत अन्याय झाला आहे. तो येणाऱ्या पाच वर्षामध्ये होणार नाही. माझ्या मतदारसंघात जेवढी मोठी गावे आहेत, त्यामधील वाल्हे गावावर विशेष लक्ष केंद्रित करून गावाच्या विकासाच्या दृष्टीने भरीव योगदान देणार आहे.
गुंजवणीचे पाणी या भागातील शिवारामधून आणून दुष्काळी गाव असल्याची प्रतिमा लवकरच पुसली जाईल, अशी ग्वाही आमदार संजय जगताप यांनी दिली. वाल्हे (ता. पुरंदर) येथे पुरंदर-हवेलीचे नवनिर्वाचित आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य विभागाचे सभापती प्रमोद काकडे यांचा वाल्हे येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जगताप म्हणाले की, तरूणांसाठी रोजगार निर्मितीसंदर्भात विशेष प्रयत्न करणार आहे. व्यापार संकुल, ओपन जीम, रेल्वेच्या सुविधा, अभ्यासिका, रस्ते दुरूस्ती व शाळा दुरूस्ती, बसथांबा, ग्रंथालय, ग्रामीण रूग्णालयासह धार्मिक स्थळांचा विकास आराखड्यात भरीव योगदान देऊन वाल्ह्याचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या नियोजनपूर्वक प्रयत्नातून खऱ्या अर्थाने या भागातील विकास होत आहे. यापुढेही त्यांच्या विकासात्मक प्रस्तावाला व उर्वरित विकासकामांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
यावेळी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते गावांमधील विविध पदावर निवड झालेल्या संतोष भुजबळ, निलेश कुदळे, प्रा. संतोष नवले, भारतीय पत्रकार संघटनेच्या पुरंदर तालुकाध्यक्ष पत्रकार सिकंदर नदाफ आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरूंगे, माणिकराव झेंडे, बबुसाहेब माहूरकर, विराज काकडे, प्रदीप पोमण, शिवाजी पोमण, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, राजेश चव्हाण, ऍड. विजय भालेराव, फत्तेसिंह पवार, भाऊसाहेब भोसले, डॉ. सतीश खलाटे, मदन भुजबळ, गोरख कदम, नारायण पवार, डॉ. रोहिदास पवार, दीपक पवार, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पवार, सुरेखा भुजबळ, दीपाली भोसले, अंजली कुमठेकर, सुनीता भुजबळ, सुनीता ढोबळे, अमोल भुजबळ, जयवंत भुजबळ, सूर्यकांत पवार, पोपट पवार, राजेंद्र पवार, किरण भुजबळ उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक कुमठेकर यांनी केले. किरण कुमठेकर यांनी आभार मानले.