मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव सभागृहात मांडण्यात यावा, अशी मागणी करीत भाजपने सभागृहात गोंधळ घातला. विरोधी पक्षाने केलेली मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळताच विरोधी पक्षातील आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.
कॉंग्रेसच्या शिदोरी मासिकात वीर सावरकरांच्याबद्दल अपमानास्पद लिखाण करण्यात आलेत आहे. या मासिकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सरकारने विधानसभेत गौरव प्रस्ताव आणावा असे फडणवीस म्हणाले.
त्यावर अनिल परब यांनी आगोदर सावरकरांना भारतरत्न द्या मग अभिनंदनाचा प्रस्ताव आणतो, त्यापूर्वी नितेश राणे यांचे मत जाणून घ्या असा उपरोधिक टोला विरोधकांना लगावला. दरम्यान केंद्र सरकारला पत्र लिहून स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. पण केंद्राने अद्यापही त्यांची दाखल घेतली नाही.
केंद्रात तुमचंच सरकार आहे. त्यामुळे तुम्ही केंद्र सरकारकडे सावरकरांना भारत रत्न देण्यासाठी प्रयत्न करावे, राज्य सरकारतर्फे आम्हीही करू, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.