नवी दिल्ली : सर्वसामान्यांचे बजेट पुन्हा एकदा कोलमडणार आहे. कारण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे.
इंडियन ऑईलने या दरवाढीसंबंधी माहिती दिली आहे. दिल्लीमध्ये 14 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरात 155.50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार दिल्लीत आता सिलेंडर 858.50 रुपयांना मिळणार आहे.
The prices had not increased after 1st January 2020. https://t.co/iF6Ml6s2gP
— ANI (@ANI) February 12, 2020
मुंबईमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात 145 रुपयांनी वाढ झाली असून तो 829.50 रुपायांना मिळणार आहे. तर कोलकातामध्ये गॅस सिलेंडरच्या दरात 149 रुपयांनी वाढ होत सिलेंडर 896 रुपयांना मिळणार आहे. दरम्यान, सलग पाचव्या महिन्यात झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना याचा फटका असणार असल्याचे दिसत आहे.