नेल्लोर : आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून स्कूल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली. या प्रकाराने विद्यार्थ्यांच्या शाळेतील प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
विद्या विहार शाळेच्या बस चालकाने या मुलीला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढले. तो तिला दिनदयाळनगर येथे निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्याचे वर्तन पाहून ती मुलगी घाबरली. ती रडू लागल्याने तेथे स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांना खरी परिस्थिती समजताचा त्यांनी या बस चालकाचे कपडे फाडून त्याला बेदम चोपले. ही माहिती समजताच पोलिस घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी या बसचालकाला ताब्यात घेतले.
या घटनेची माहिती समजताच या मुलीचेर पालकही घटना स्थळावर दाखल झाले. त्यांनी अन्य पालकांसह या बस चालकासह शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्यासाठी धरणे धरले. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.