आॅकलंड : नवनीत कौरच्या दोन गोलच्या जोरावर भारतीय महिला हाॅकी संघाने बुधवारी पाच सामन्यांच्या दौ-यातील अखेरच्या लढतीत यजमान न्यूझीलंडवर ३-० ने मात केली. यासह भारतीय संघाने न्यूझीलंड दौ-याचा शेवट विजयाने केला.
भारताकडून नवनीत कौरने ४५ व्या आणि ५८ व्या मिनिटाला गोल केले, तर तिसरा व निर्णायक गोल शर्मिलाने ५४ व्या मिनिटाला केला.
FT: 🇮🇳 3-0 🇳🇿
The Eves have done it! 🏑🥳
Congratulations to #TeamIndia for their spectacular performance today. 👏 #IndiaKaGame pic.twitter.com/M7VRuyMPAt
— Hockey India (@TheHockeyIndia) February 5, 2020
भारतीय संघाने या दौ-यात पहिल्या लढतीत न्यूझीलंड डेव्हलपमेंट संघाला ४-० ने पराभूत केले होते. यानंतर भारताला न्यूझीलंडकडून दुस-या लढतीत १-२ आणि तिस-या लढतीत ०-१ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर चौथ्या लढतीत भारताने ब्रिटनवर १-० ने विजय मिळवला होता.