त्रिपुरा – त्रिपुरातील एका बलात्कार पीडितेने कोर्टाच्या चेंबरमध्ये एका न्यायाधीशाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. एका वरिष्ठ वकिलाने सांगितले की, धलाई जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गौतम सरकार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने पीडितेच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे.
या महिलेने आरोप केला आहे की, बलात्काराच्या चौकशीबाबत ती १६ फेब्रुवारी रोजी कमलपूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये गेली होती. ती तिचे म्हणणे मांडत असताना न्यायाधीशांनी माझा विनयभंग केला.
मी त्यांच्या चेंबरमधून बाहेर आले आणि वकिलांना आणि माझ्या पतीला घडलेला प्रकार सांगितला. या महिलेने आपली तक्रार कमालपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे केली आहे.
या घटनेबाबत महिलेच्या पतीने कमालपूर बार असोसिएशनकडे स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून तात्काळ कारवाई करत जिल्हा व सत्र न्यायाधीश गौतम कुमार आणि मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यजित दास यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कमालपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे कार्यालय गाठले.
यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने कमालपूर बार असोसिएशनच्या सदस्यांचीही न्यायालयाच्या आवारात भेट घेतली. समितीने महिलेच्या आरोपांवर त्यांची भूमिका ऐकून घेतली. बार असोसिएशनचे सचिव शिवेंद्र दासगुप्ता म्हणाले की, आम्ही आमचे मुद्दे समितीसमोर मुद्देनिहाय मांडले आहेत.
न्यायमूर्तींवरील आरोपांबाबत त्रिपुरा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल व्ही पांडे म्हणाले की, या प्रकरणाबाबत आम्हाला अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. आम्हाला योग्य स्वरुपात तक्रार प्राप्त झाल्यावर आम्ही निश्चितपणे योग्य ती कारवाई करू.