“तू यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है; मुनगंटीवारांच्या ‘सेना’ प्रेमाला उकळी
मुंबई: शिवसेनेचे खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर राजकीय प्रतिक्रियांना उधाण आलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून ही मुलाखत भाजप-सेनेतील स्नेह दर्शविणारी असल्याचे म्हटले आहे.
मुनगंटीवार म्हणाले, ही मुलाखत पूर्ण पाहिली तर या मुलाखतीचा सारांश एका चित्रपटाच्या गाण्याप्रमाणे सांगता येईल. “तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है” पण यात फक्त एकच बदल केला पाहिजे की, “तू यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है,”
तसेच मुंगंटीवार म्हणाले, “एनआरसी चा जो कायदा आहे त्यात बाळासाहेब ठाकरेंनी अभिप्रेत केलेली भावना आहे. त्यामुळे आपला राग भाजपवर असू शकतो. पण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर हा राग काढता कामा नये.