पुणे – जीवे मारण्याची धमकी देत 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी अमित रावसो पाटील (वय 36, रा. सिंहगड रोड) याला अटक केली. याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यासह बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ऑक्टोबर 2019 ते 11 जानेवारी 2020 या कालावधीत फिर्यादीच्या राहत्या घरी व पानशेत येथील एका फार्म हाऊसवर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. त्यातूनच आरोपीने पीडित मुलीला वारंवार फोन करून इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे सतत पाठलाग करत होता. त्यानंतर पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर घरी व पानशेत येथील एका फॉर्म हाऊसवर नेऊन तीनवेळा अत्याचार केला. जेव्हा पीडित मुलीने हा प्रकार घरच्यांच्या कानावर घातला तेव्हा पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे करीत आहेत.