नवी दिल्ली : भारतीय बाॅक्सिंगपटू मोहम्मद हसमुद्दीन याला ५७ किलो वजनी गटात बल्गेरियाच्या सोफियामध्ये झालेल्या ७१ व्या स्ट्रांदझा स्मृती बाॅक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
Many congratulations to @hussamboxer for winning the silver medal in men’s 57 kg at the 71st #Strandja International Boxing Tournament.@KirenRijiju @PIB_India @DGSAI @RijijuOffice @PMOIndia @ddsportschannel @AkashvaniAIR @BFI_official @DGSAI pic.twitter.com/1mkYocq8SE
— SAI Media (@Media_SAI) January 26, 2020
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीच्या फ्रांसिस्को माईएटाने भारताच्या हसमुद्दीन चा ४-१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
हसमुद्दीनने या स्पर्धेत २०१७ मध्येही रौप्यपदक पटकावलं होते. दुसरीकडे भारतीय महिला बाॅक्सिंगपटू सोनिया लाठेर(५७ किलो) आणि बाॅक्सिंगपटू शिव थापा (६३ किलो) यांनी याच स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे.