नवी दिल्ली : भारताची महिला बाॅक्सिंगपटू सोनिया लॅथर (५७ किलो) आणि पुरूष बाॅक्सिंगपटू शिव थापा (६३ किलो) यांना बल्गेरियाच्या सोफियामध्ये झालेल्या स्ट्रांदझा स्मृती बाॅक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दोघांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
#TOPSAthlete @shivathapa and @SoniaLatherBoxe won the bronze medal in the prestigious #Strandja Int’l Boxing tournament in men’s 63 and women’s 57 kg respectively. @Hussamboxer has entered the final in men’s 57 kg.@KirenRijiju @DGSAI @RijijuOffice @BFI_official @IndiaSports pic.twitter.com/wTqFonpI9N
— SAI Media (@Media_SAI) January 25, 2020
उपांत्य फेरीच्या सामन्यात सोनिया लॅथर हिचा युक्रेनच्या लुलिया साइप्लाकोवा हिने २-३ असा पराभव केला. दरम्यान, याआधी सोनिया लॅथर हिने ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडच्या मिचेल वाॅल्शचा ३-२ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
भारतीय बाॅक्सिंगपटूनी या स्पर्धेत आतापर्यंत दोन पदके पटकावली आहेत. स्पर्धेत ३० देशांच्या २०० हून अधिक बाॅक्सरांनी भाग घेतला आहे.