नवी दिल्ली : रियल काश्मीर एफसी संघाने रविवारी आय-लीग फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात इंडियन एरोज संघाचा पराभव करत विजय नोंदविला. रियल काश्मीर एफसी संघाने पूर्वार्धात आणि उत्तरार्धात एक-एक गोल करत इंडियन एरोजवर २-० ने विजय मिळविला.
FULL-TIME! It comes to an end, and @realkashmirfc take home the 3⃣ points today 🙌
ARW 0-2 RKFC
🤳: https://t.co/S6A9uPG4w8#ARWRKFC ⚔ #HeroILeague 🏆 #LeagueForAll 🤝 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/SEHL36okrW
— Hero I-League (@ILeagueOfficial) January 26, 2020
रियल काश्मीर संघाकडून सामन्याचा मानकरी मेसन रोबर्टसन याने १८ व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर गनोहेयर क्रिजोने ५७ व्या मिनिटाला दूसरा व विजयी गोल केला.
रियल काश्मीर संघाचा चार सामन्यानंतर हा पहिला विजय आहे. त्याचे ७ सामन्यात ९ गुण असून ते गुणतालिकेत ७ व्या स्थानी आहेत. दुसरीकडे इंडियन एरोज संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. ८ सामन्यात ४ गुणांसह त्यांचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे.