नवी दिल्ली : इंडियन सुपर लीगमध्ये गुरूवारी झालेल्या फुटबाॅल सामन्यात चेन्नईन एफसी संघाने जमशेदपूर एफसी संघाचा ४-१ ने पराभव करत शानदार विजय मिळविला.
A third double of the season from @NValskis helps @ChennaiyinFC romp to victory at the Marina Arena! #CFCJFC #HeroISL #LetsFootball pic.twitter.com/4WKwhiH1j5
— Indian Super League (@IndSuperLeague) January 23, 2020
चेन्नईन एफसी संघाकडून नेरीजस्ट वालस्किसने १३ व्या मिनिटाला आणि ७४ मिनिटाला असे दोन गोल करत संघाच्या विजयात महत्वाचे योगदान दिले. तर आंद्रे शेम्ब्रीने ४३ व्या मिनिटाला आणि लालरियांगजुआला चांगटे याने ८७ व्या मिनिटाला गोल केला. जमशेदपूर एफसी संघाकडून सर्गियो कास्टेल याने ७१ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
या विजयासह चेन्नईन एफसी संघ १८ गुणांसह ६ व्या स्थानी पोहचला आहे. तर, जमशेदपूर एफसीचा संघ १६ गुणांसह ७ व्या स्थानी घसरला आहे.