किम्बर्ली (द.आफ्रिका) : जयडें सील्स आणि एशमेड नेड यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर वेस्टइंडिजने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी नायजेरियाचा २४६ धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. फलंदाजीत ६८ धावांची खेळी करणारा आणि गोलंदाजीत १६ धावा देत २ गडी बाद करणारा विंडीजचा मैथ्यू पैट्रिक सामनावीर ठरला.
WI U19 COMPLETE THE HATTRICK!
Australia✅
England✅
Nigeria✅QUALIFICATION✅⚡#ItsOurGame #U19CWC#FutureStars pic.twitter.com/hdB0dJCbmR
— Windies Cricket (@windiescricket) January 23, 2020
वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना किमानी मेलियसच्या ६५,मैथ्यू पैट्रिकच्या ६८, जोशुआ जेम्सच्या ४३ आणि केवलन एंडरसनच्या २५ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ८ बाद ३०३ धावा केल्या होत्या. यामध्ये ४६ धावा ( बाय १०, एलबी ६, वाईड २६, नो बाॅल ४) अतिरिक्त होत्या. नायजेरियाकडून गोलंदाजीत पीटर आहो, अब्दुलरहमान आणि सिल्वेस्टर ओकपे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
A Matthew Patrick half-century powers West Indies to 303/8 from their 50 overs.#U19CWC | #WIvNGA | #FutureStars pic.twitter.com/nVehDmIU8N
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 23, 2020
विजयासाठी ३०३ धावांचा पाठलाग करताना नायजेरियाचा डाव २१.४ षटकांत अवघ्या ५७ धावांवर संपुष्टात आला आणि त्यांना २४६ धावांनी पराभवाला सामोरे जावं लागलं. नायजेरियाकडून सिल्वेस्टर ओकपेने १० आणि अब्दुलरहमान याने १७ धावा केल्या. या दोघां व्यतिरिक्त एकाही फलंदाजांला दुहेरी धावसंख्या करता आली नाही.
A blistering new ball spell from Jayden Seales 🚀 #U19CWC | #WIvNGA | #FutureStars pic.twitter.com/68wFYflCOm
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 23, 2020
वेस्टइंडिजकडून गोलंदाजीत जयडें सील्सने ६ षटकात १९ धावा देत सर्वाधिक ४ गडी , एशमेड नेडने ५.४ षटकात ११ धावा देत ३ गडी तर मैथ्यू पैट्रिकने ५ षटकांत १६ धावा देत २ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.