मेलबर्न : भारताचा आघाडीचा टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरनला यावेळेस नशिबाने साथ दिली नाही आणि त्याला आॅस्ट्रेलियन ओपनच्या पुरूष एकेरीच्या मुख्य फेरीच्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे प्रजनेशचे त्याचबरोबर भारचाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
India's Prajnesh Gunneswaran crashes out in men's singles opening round of Australian Open. #TENNIS #AusOpen
— Press Trust of India (@PTI_News) January 21, 2020
मंगळवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या मुख्य फेरीतील पहिल्या सामन्यात जपानच्या तात्सुमो इटोने प्रजनेशचा ४-६, २-६, ५-७ असा पराभव केला. प्रजनेश जागतिक क्रमवारीत १२२ व्या स्थानी तर इटो १४५ व्या स्थानी आहे. आता तात्सुमो इटोपुढे पुढील सामन्यात जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचचे आव्हान असणार आहे.
GOOD NEWS for all the Indian Tennis fans 🇮🇳🥳
Prajnesh Gunneswaran enters main draw of Australian Open as a 'Lucky Loser'.
He'll play Tatsuma Ito in his Round 1 clash & can potentially face @DjokerNole in the 2nd Round 💪🎾#AusOpen @PrajneshGP pic.twitter.com/5LLGqoEDnk
— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) January 18, 2020
दरम्यान, पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात प्रजनेशला लॅटेव्हियाच्या अर्नेस्ट गुलबीस याने पराभूत केल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. मात्र प्रजनेशच्या नशिबाने त्याला साथ दिली. स्पर्धेत सरळ प्रवेश मिळालेल्या एका खेळाडूने माघार घेतली होती आणि प्रजनेश गुणेश्वरन याला ‘लकी लूजर’ म्हणून आॅस्ट्रेलियन ओपनच्या पुरूष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळाला होता.