नीरव मोदी यांच्या घड्याळाचा होणार लिलाव

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणूक प्रकरणातील फरार व्यापारी नीरव मोदी यांच्या जप्त केलेल्या महागड्या घड्याळे, हँडबॅग्ज, कार आणि कलाकृतींचा लिलाव करण्यात येणार आहे. सैफरनआर्ट हा लिलाव करेल.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लिलावाची जबाबदारी सैफरनआर्ट यांचेकडे सोपवली आहे. पहिला लिलाव 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार असून दुसरा लिलाव  3-4 मार्च रोजी ऑनलाईन केला जाईल. लिलावामध्ये अमृता शेरगिल यांची 1935 ची पेंटिंग, एम.एफ. हुसेनची ‘महाभारत’ ऑइल पेटिंग, व्ही. गायतोंडे यांची 1972 ची पेंटिंग आणि मनजित बावांची ‘कृष्णा’ पेंटिंग लिलावात सामील असेल.

शेरगिल आणि हुसेन यांच्या पेटींगची किंमत अंदाजे 12 ते 18 कोटी रुपये आहे, तर गायतोंडे यांच्या पेंटिंगची किंमत सात ते नऊ कोटी आणि बावाच्या पेटींगची किंमत तीन ते पाच कोटी आहे. या व्यतिरिक्त 80 हून अधिक ब्रांडेड हँडबॅग देखील असतील.

सैफरनआर्टचे सहसंस्थापक दिनेश वझरानी यांनी सांगितले की, लिलावात जगातील सर्वात जास्त लक्झरी घड्याळांपैकी एक असलेल्या एजर-ला-कॉटच्या घड्याळांचा समावेश आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here