कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने आयोजन
पिंपरी – कलारंग सांस्कृतिक कला संस्था, पिंपरी-चिंचवडतर्फे “एक तोचि नाना’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांचा सांस्कृतिक व सामाजिक प्रवास उलगडणारी प्रकट मुलाखत समीरन वाळवेकर घेणार आहेत, अशी माहिती कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी रविवारी (दि. 19) पत्रकार परिषदेत दिली.
कलारंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी-चिंचवड, परिसरात सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत आहे. यावर्षी कलारंग संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाना पाटेकर यांचा जीवनपट शहरवासीयांसमोर उलगडण्याचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी पाच वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. या कार्यक्रमात स्थानिक कलाकार व सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. पी. डी. पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापौर माई ढोरे, भाऊसाहेब भोईर (अध्यक्ष अ.भा.ना.प), उपस्थित राहणार आहेत.