बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय संस्कृती आणि परंपरांचे ध्वजवाहक आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
कर्नाटकातील वेदांत भारतीच्या मेळाव्यात शहा बोलत होते. भारतीय संस्कृतीची पतका फडकावत ते जगभर फिरत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापुर्वी गंगेत पवित्र स्नान केले होते. आणि काशीत गंगा आरती केली होती, असेही ते म्हणाले.
नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात भारत सरकारच्या वतीने मोदी यांनीच प्रथमत:च विशेष प्रार्थना केली होती.
या समारंभातही त्यांनी आधीच्या सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, आधीच्या सरकारने धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावला. या दोतील चांगल्या गोष्टींचा सन्मान करण्यापासून रोखले असे ते म्हणाले.