पुणे : प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत जेएलव्ही ऍग्रो, इलाईट स्ट्रायकर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात इलाईट स्ट्रायकर्स संघाने अमन किया मोटर्स संघाचा 15 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. इलाईट स्ट्रायकर्स संघाने 12 षटकात 2 बाद 80 धावा केल्या.
यात करण गर्ग 34, कवित पोद्दार 29 यांनी धावा केल्या. अमन किया मोटर्स संघाला 12 षटकात 3 बाद 65 धावाच करता आल्या. इलाईट स्ट्रायकर्सकडून कवित पोद्दार (1-7), देवांश अगरवाल (1-8) यांनी सुरेख गोलंदाजी करत अमन किया मोटर्स संघाला 65 धावावर रोखले.
दुसऱ्या सामन्यात जिएलव्ही ऍग्रो संघाने मिस्टर मिल्क वॉरियर्स संघाचा 6 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
साखळी फेरी – इलाईट स्ट्रायकर्स – 12 षटकात 2 बाद 80 धावा (करण गर्ग 34, कवित पोद्दार 29, सागर अगरवाल 1-5, सतपाल मित्तल 1-13) वि. वि. अमन किया मोटर्स – 12 षटकात 3 बाद 65 धावा (सागर अगरवाल 28, संदीप जैन 14, कवित पोद्दार 1-7, देवांश अगरवाल 1-8); मिस्टर मिल्क वॉरियर्स – 8.3 षटकात सर्वबाद 59 धावा (राम जिंदाल 29, विवेक अगरवाल 4-8, पुनीत अगरवाल 1-11) पराभूत वि. जेएलव्ही ऍग्रो – 8.5 षटकात 4 बाद 61 धावा (पुनीत अगरवाल नाबाद 29, मुकेश बन्सल 1-11, खुश अगरवाल 1-6).