अमित शहा यांच्या टीकेची अरविंद केजरीवाल यांचुकडून खील्ली
नवी दिल्ली : दिल्लीत आमच्या कामांत काही कमतरता असतील तर त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलतील, अशी माझी अपेक्षा होती. ते दिल्लीच्या विकासाबाबत बोलतील असे वाटत होते, पण त्याबद्दल एक अवाक्षर न काढता त्यांनी नुसतीच मला शिविगाळ केली, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहा यांची खिल्ली उडवली.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अमिथ शहा यांनी केजरीवाल लोकांची दिशाभूल करून सत्तेवर आले आहेत. त्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे, अशी टीका केली होती. त्याल केजरीवाल यांनी उत्तर दिले. जर त्यांच्या दिल्लीसाठी काही सुचना असतील तर जरूर मांडाव्यात, त्यातील चांगल्या सूचनांची आम्ही पुढील पाच वर्षात अंमलबजावणी करू, असे केजरीवाल म्हणाले.
दिल्लीत भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. जनतेला एकदा फसवता येत.े वारंवार नही,असेही ते म्हणाले. 70 सदस्यांच्या दिल्ली विधान सभेत भाजपाचे तीन तर आपचे 67 सदस्य आहेत.