मुंबई : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश यांच्यावर तिकीट कापल्याचे आरोप केल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मोठ्या पदावर आहेत. ते असं काही करणार नाहीत. तर गिरीश महाजनही मंत्री होते त्यांनी खडसेंविरोधात काम करण्याची शक्यता नाही. त्यांनी एकनाथ खडसे विरोधात काम करणं हे अशक्य आहे. असे प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे भविष्यात दिल्लीत जातील अशी भविष्यवाणी देखील त्यानी केली.
भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात काम केल्याचे पुरावे खडसे यांनी दिले आहेत. त्या पदाधिकाऱ्यांनी खडसे आणि पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचे आव्हान केले होते. खडसेंनी दिलेले पुरावे जर त्या पदाधिकाऱ्यांवर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.