मुंबई – बॉलीवूड अभिनेता कुशल पंजाबी याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अॅक्टर कुशल पंजाबी याने त्याच्या वांद्रेमधल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
Mumbai: Television actor Kushal Punjabi found hanging at his Pali Hill residence. Police has found a suicide note at his residence. Accidental Death Report (ADR) filed, further investigation underway
— ANI (@ANI) December 27, 2019
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना अभिनेत्याची सुसाइड नोटही सापडली आहे. अॅक्टरच्या आत्महत्येमुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.अभिनेता कुशल पंजाबी मागच्या काही दिवसांपासून हा नैराश्याने ग्रस्त होता असे त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून काम मिळत नसल्याने कुशल पंजाबी डिप्रेशनध्ये होता, असे त्याचे मित्र सांगत आहेत. त्याने मानसिक त्रासातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून सुसाइड नोटमधील तपशील अद्याप समोर आलेला नाही. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.