नवी दिल्ली – सुधारित नागरिकत्व कायद्याला (का) विरोध करण्यासाठी देशभरात शेकडो निदर्शने सुरु आहेत. कर्नाटकातील मंगळुरू येथे पोलिस आणि निदर्शकांत झालेल्या संघर्षात दोन जण मरण पावले. दरम्यान, आजही देशभरात ठिकठिकाणी निदर्शने चालू आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस नेत्या आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सुकन्या शर्मिष्ठा मुखर्जी नेतृत्वाखाली काँग्रेस महिलांनी आंदोलन केले. यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, शर्मिष्ठा यांनी स्टेशनच्या आवारातही आपले आंदोलन सुरुच आहे.
Delhi: Police detain Delhi Mahila Congress President Sharmistha Mukherjee & other Congress workers who were protesting against #CitizenshipAct near the residence of Home Minister Amit Shah. pic.twitter.com/Qt4Ndatp7u
— ANI (@ANI) December 20, 2019