नागपूर – शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीर सावरकर यांच्यासह अनेक मुद्यांमुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन सुरुवातीपासूनच वादळी ठरले आहे. मात्र आज पहिल्यांदाच सर्व आमदार मतभेद विसरून फोटोसेशनसाठी एकत्र जमले. परंतु, या फोटोफ्रेममध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कुठेच दिसले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन, नागपूर-२०१९
Winter Session of the Maharashtra Legislature 2019, Nagpur pic.twitter.com/WFDYrbGXW9
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 20, 2019
मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विरोधीपक्ष नेते आणि सर्वपक्षीय सदस्यांचे एकत्रित फोटोसेशन करण्याची विधीमंडळाची परंपरा आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा देत आंदोलन करतात, त्याच विधानभवनाच्या आवारात सर्वपक्षीय आमदार फोटोसेशनसाठी एकत्र येतात. यानुसार आजही सर्वांनी फोटोसेशन केले.
दरम्यान, विरोधी पक्षनेत्याला आज बोलवले होते. मात्र वैयक्तिक कारणामुळे आज ते हजर राहू शकले नसल्याचे वीरधनसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.