चिंचवड ते कन्याकुमारी सायकल प्रवास

पिंपरी – हन्टर्स ट्रेकिंग अँड सोशल कल्ब पिंपरी चिंचवडच्या वतीने चिंचवड ते कन्याकुमारी सायकल राइडचे आयोजन करण्यात आले होते. क्‍लबच्या वतीने नागरिकांमध्ये निसर्गाबाबत आवड निर्माण व्हावी, यासाठी ट्रेकिंग, सायकलिंग, धावणे या बरोबर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, गडकिल्ले स्वच्छता अभियान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने चिंचवड ते कन्याकुमारी या 1600 किलोमीटर सायकल राइडचे आयोजन करण्यात आले होते.

चिंचवडपासून सुरू झालेल्या या राइडमध्ये हंटर ट्रेकिंग आणि सोशल क्‍लबचे सहा सभासद सामील झाले होते. सचिन मेहंदळे यांनी सायकल राइडचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली तुषार ताव्हरे, अविनाश पाटील, राजेश शेवकरी, चंद्रकांत भोईर, रोहिणी पोटे यांनी हा खडतर सायकल प्रवास अवघ्या 9 दिवसात यशस्वीरीत्या पूर्ण केला.

पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला प्रणाम करून डांगे चौक थेरगाव येथून सायकल राइडला सुरुवात झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या राज्यातून फिरून शेवटी तामिळनाडू येथे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाजवळ सायकल राइड पूर्ण झाली. सायकल राईडच्या नियोजनामध्ये हंटर ट्रेकिंग अँड सोशल क्‍लबचे डॉ. गणेश भोईर, निलेश देशमुख, अशोक पाबळे, महेश छाजेड, मालेश गावडे, डॉ महेश झगडे, चेतन साळुंखे, डॉ. सारिका भोईर, स्मिता टाव्हरे, लीना पाटील, रेश्‍मा शेवकरी, अनघा मेहंदळे यांचे सहकार्य लाभले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.