विद्यार्थ्यांना २४ तास सेवा उपलब्ध
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या अद्ययावत ‘क्लाऊड प्रिटिंग सोल्यशन्स’ (CPS) सुविधेचे उद्घाटन कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर यांच्या हस्ते budhvarझाले. या वेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठ मुद्रणालयाचे संचालक डॉ. दत्तात्रय कुटे, डब्लू.ई.पी. सोल्यूशन्स प्रा. लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनीष गर्ग, आदी. उपस्थित होते.
या सुविधेद्वारे विद्यार्थी त्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरील फोटो – फाईल यांच्या प्रती घेऊ शकतील. ही सुविधा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’जवळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा चोवीस तास उपलब्ध असेल. या सुविधेबाबत श्री. मनीष गर्ग यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.