मुंबई – 26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. या दहशतवादी हल्ल्याला अनेक वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, या हल्ल्याला आज इतकी वर्षं झाली असली तरी आजही हल्ल्याची आठवण आल्यास शरीरावर काटा येतो.
दरम्यान, याच हल्ल्याची सत्य घटना सांगणारा ‘हॉटेल मुंबई’ चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला आहे. ‘हॉटेल मुंबई’ने दोन दिवसात २.७८ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने शुक्रवारी १.०८ कोटींची कमाई केली असून, शनिवारी १.०७ कोटींची मजल मारली आहे.
‘हॉटेल मुंबई’ चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात जेष्ठ अभिनेते ‘अनुपम खेर’ आणि देव पटेल, आर्मी हॅमर अशी दमदार स्टारकास्ट आहे.