कराड – महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळास आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिवादन केले.
कराड येथील प्रीतिसंगमावर सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास पवार आले. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन केले. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.