पुणे : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार धनंजय मुंडे हे सुमारे साडेनऊ तासांपर्यंत ‘नॉट रिचेबल’ होते. ते काही वेळापर्यंत नॉट रिचेबल होते. अजित पवार यांच्या आजच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे का अशा चर्चांना उधाण आले होते.
परंतु नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे शनिवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजून ३२ मिनिटांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आल्याने यात नवा ट्विस्ट आला.
त्यानंतर धनंजय मुंडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया अथवा स्पष्टीकरण दिलं नव्हत. पंरतु आज धनंजय मुंडे यांनी पहिल्यादांच ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, ” मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत. कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये ही विनंती.”
मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत. कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये ही विनंती.@PawarSpeaks @NCPspeaks
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 24, 2019
दरम्यान, आज रविवारी अजित पवार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये देखील ट्विटर युद्ध पहायला मिळालं.