मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित ‘फत्तेशिकस्त’ या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफीवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने आतापर्यंत तब्ब्ल ५.६५ कोटींची कमाई केली आहे.
‘फत्तेशिकस्त’ चित्रपट शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आणि त्यांच्या युद्धनीतीवर आधारती आहे. चित्रपटाच्या निमित्ताने शत्रूच्या गोटात घुसून मारणारी शिवरायांची युद्धनिती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
View this post on Instagram
फत्तेशिकस्त ची बॉक्स ऑफिस वर सुसाट कमाई.. 5.65cr एका आठवड्याची कमाई…. @fatteshikast
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात विविध कलाकारांची फौज पहायला मिळतेय. अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारखी स्टारकास्टही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.