राफेल प्रकरणावरून भाजप आक्रमक
राहुल गांधींनी देशाची माफी मागण्यासाठी देशव्यापी आंदोलन
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेता राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या विरोधात भाजपने देशव्यापी आंदोलन सुरु केले आहे. राफेल मुद्द्यावर राहुल गांधी खोटे बोलत असून त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत भाजप देशभरामध्ये आंदोलन करत आहे.
काँग्रेस नेते @RahulGandhi यांनी #राफेल प्रकरणात खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जनतेला सत्य कळलं आहे.स्वत:च्या स्वार्थासाठी @RahulGandhiनी मा. @narendramodi यांची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी देशातील जनतेची माफी मागावी. pic.twitter.com/n8D7QFWH9W
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 16, 2019
मुंबईमध्ये देखील भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दादर येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरु आहे.
राफेल मुद्द्यावर राहुल गांधीसह कॉंग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राहुल गांधींना ‘जनाची नाही तर मनाची असेल’ तर त्यांनी माफी मागावी असे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले असून राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.