रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपट अनाउंसमेंट झाल्यापासूनच कायम चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून त्याला उत्स्फुर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यातच आता किंग खान म्हणजे शाहरुख खानही या चित्रपटात स्पेशल अरपीयरेंस म्हणून काम करत आहे. याचे कामही शाहरुखने सुरु केल्याची समजते.
याबाबत एक ट्वीटवरून अशी माहिती कळते की, शाहरुखने “ब्रह्मास्त्र’च्या चित्रिकरणाचा प्रारंभ केला आहे. या ट्वीटच्या यूजरने लिहिले आहे की, “शाहरुख ब्रह्मास्त्र के साथ नाइट शेड्यूल डे 1.’
दरम्यान, रणबीर आणि आलिया यांच्या या आगामी चित्रपटापेक्षा सध्या दोघांच्या अफेयर्सचीच चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. “ब्रह्मास्त्र’मध्ये या दोघा कलाकारांसह मोठी फौज आहे.
यात अमिताभ बच्चन आणि साउथ इंडियन सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन महत्तवाची भूमिका साकारत आहे. तसेच अयान मुखर्जीच्या या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय ही झळणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.