30 सप्टेंबर 2019 रोजी संपलेल्या तिमाहीत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचा नफा दुपटीने वाढून तो 1,092.5 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 503.80 कोटी रुपये होता.
जागतिक बाजारपेठेत जेनेरिक औषधांच्या क्षेत्रात कंपनीची उलाढाल सात टक्क्यांनी वाढून 3,280 कोटींवर पोचली आहे. युरोप आणि भारतीय बाजारपेठेमुळे ही वाढ झाली असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
उत्तर अमेरिकेतील उलाढाल स्थिर असून युरोप (280 कोटी) आणि भारत (750 कोटी) अन्य उदयास येणाऱ्या बाजारपेठांमध्ये (830 कोटी रुपये) उलाढालीत वाढ झाली आहे.