उलाढालीतील वाढीत बाजाराची अपेक्षापूर्ती न झाल्याने मेरिकोच्या भावात घसरण झाली. पॅराशूट हा खोबरेल तेलाच्या ब्रॅंडमुळे परिचित असलेल्या मेरिको लिमिटेडसाठी ही तिमाही कठीण गेली. कंपन्यांच्या सगळ्याच उत्पादनांच्या उलाढालीत घट झाल्याचे दिसून आले आहे.
त्याचबरोबर कंपनीची कामगिरीदेखील बाजाराच्या अपेक्षेनुसार झालेली दिसत नाही. सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्के वाढ अपेक्षित होती, मात्र वाढीऐवजी 0.4 टक्के घट झाल्याचे दिसत आहे.
सुटे खोबरेल तेल आणि पॅराशूटचे ब्रॅंडेड खोबरेल तेल यांच्या किंमतीतील फरक वाढल्याने पॅराशूटच्या विक्रीत 4 टक्के घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कंपनीच्या वाढीचा हा सर्वात मंदवलेला वेग आहे. मात्र कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात तब्बल आठ टक्क्यांची वाढ झालेली आहे.