मुंबई – बायपास रोड या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
New release date for #BypassRoad: 8 Nov 2019… PVR Pictures joins hands with Miraj Entertainment and NNM Films to distribute the film… Stars Neil Nitin Mukesh, Adah Sharma, Shama Sikander, Gul Panag, Rajit Kapur and Sudhanshu Pandey… Directed by Naman Nitin Mukesh. pic.twitter.com/jkYSyP1faN
— taran adarsh (@taran_adarsh) October 24, 2019
या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. नील नितीन मुकेश याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नीलचा भाऊ नमन मुकेश करत आहे. नमन मुकेशचा हा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट आहे.
‘बायपास रोड’ या चित्रपटात नील नीतिन मुकेशसोबत अधा शर्मा ही अभिनेत्री काम करीत असून गुल पनंग, शमा सिकंदर, रजीत कपूर, सुधांशू पांडे, मनिष चौधरी आणि ताहेर शब्बीर यांच्या या सिनेमात भूमिका आहेत.