नवी दिल्ली – अमेरिकी देशात जाण्यासाठी आता व्हिजाची गरज लागणार नाही. यासंदर्भात नुकतीच ब्राझीलचे पंतप्रधान जेयर बोल्सोनारो यांनी घोषणा केली. भारतीय नागरिकांना ब्राझीलमध्ये येण्यासाठी आता व्हिजाची गरज राहणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. भारतासोबतच चीन आणि दक्षिण अमेरिकेमधील नागरिकांनीही व्हिजावर सूट देण्यात आली आहे. दरम्यान, ब्राझीलचा व्हिजा तयार होण्यासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागत होता. तर वर्क व्हिजा बनविण्यासाठी ५ ते ७ दिवसांचा अवधी लागत होता.
‘या’ देशांमध्येही तुम्हाला मिळते व्हिजाशिवाय एंट्री
फिजी – येथे जाण्यासाठी तुमच्याकडे निश्चित स्वरूपात बँक बॅलन्स आणि परतीचे तिकीट पाहिजे. तसेच या ठिकाणी तुम्ही चार महिने फिरू शकता.
मॉरिशस – याठिकाणी तुम्ही ९० दिवस वास्तव्य करू शकतात.
इंडोनेशिया – येथेही तुम्हांला व्हिजाशिवाय ३० दिवसांपर्यंत पर्यटनाचा आनंद घेता येईल.
भूतान – येथे जाण्यासाठी पासपोर्ट अथवा कोणतेही वैध ओळखपत्र असावे लागते.
सेनेगल – येथे तुम्ही ३० दिवसांसाठी वास्तव्य करू शकता. परंतु, केवळ तुमचा पासपोर्ट ३ महिन्यांसाठी वैध असावा.
नेपाळ – कोणत्याही अटींशिवाय तुम्ही याठिकाणच्या पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.
केट्स अँड नेविस – याठिकाणी तुम्ही ३ महिने वास्तव्य करू शकता.
मकाऊ – येथेही तुम्ही व्हिजाशिवाय फिरण्याचा आनंद घेऊ शकता.