काँग्रेस नेते सतेज पाटील किंगमेकर; चंद्रकांत पाटील होम पिच वर अपयशी
कोल्हापूरात भाजपाला भोपळा फोडता आला नाही
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीने सेना-भाजपला चितपट करत जोरदार मुसंडी मारली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचा गड सांभाळण्यात सपशेल अपयश आलं आहे. विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघात भाजपा- सेनेला धक्का देत काँग्रेस- राष्ट्रवादीने धक्कादायक विजय मिळवला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या या विजयामुळे कोल्हापूर हा महाआघाडीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दिग्गज मातब्बरांना पराभूत केला आहे.
कोल्हापूर राज्यात विधानसभेचे बिगुल वाजलं आणि कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारांची लगबग सुरू झाली यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ येतात या मतदारसंघांमध्ये मागील विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता शिवसेना 6 भाजपा दोन राष्ट्रवादी 2 अशा एकूण दहा जागा विभागल्या गेल्या होत्या यावेळी भाजपसेना यांची झालेली युती तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांची महाआघाडी यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील झालेल्या जागावाटप यामुळे अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण आणि कागल हे दोन विधानसभा मतदारसंघ हाय होल्टेज लढतींमध्ये होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आपकी बार दोसो बीस नव्हेतर आपकी बार दो सो पचास तच असा नारा त्यांनी या कोल्हापुरात दिलेला होता त्यामुळे कोल्हापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दहा ही जागा महायुती निवडून येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता परंतु कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे दोन उमेदवार आणि शिवसेनेचे पाच उमेदवार यांना पराभव पत्करावा लागला आहे. याचाच फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीने घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील आणि राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ यांनी आपली ताकद पणाला लावत जिल्ह्यात महा युतीला धूळ चारत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली.
दिग्गज चौघांची हॅट्रिक रोखली…
क कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर , डॉक्टर सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके आणि भाजपचे सुरेश हाळवणकर हे चौघेजण यावेळी हॅट्रिक करणार होते. परंतु त्यांना रोखण्यात त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना यश आलं आणि हे चौघेही पराभूत झाले. यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या सह दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या होत्या परंतु नागरिकांनी मतदारांनी या मातब्बर दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला
कोल्हापूर जिल्हा विजयी उमेदवार
कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील, काँग्रेस
कोल्हापूर उत्तर : चंद्रकांत जाधव, काँग्रेस
इचलकरंजी : प्रकाश आवाडे, अपक्ष
शिरोळ : राजेंद्र यड्रावकर , अपक्ष (राष्ट्रवादी बंडखोर)
शाहूवाडी : विनय कोरे, जनसुराज्य
कागल : हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
करवीर : पी. एन पाटील, काँग्रेस
राधानगरी : प्रकाश आबीटकर, शिवसेना
चंदगड : राजेश पाटील, राष्ट्रवादी
हातकणंगले : राजूबाबा आवळे, काँग्रेस
विजयी झालेले उमेदवार आणि मतदान-
विधानसभा निवडणुक- 2014
कोल्हापूर एकूण जागा : 10
काँग्रेस : 00
राष्ट्रवादी : 02
अपक्ष : 00
जनसुराज्य : 00
शिवसेना : 06
वंचित : 00
भाजपा:02
विधानसभा निवडणुक- 2019
कोल्हापूर एकूण जागा : 10
काँग्रेस : 04
राष्ट्रवादी : 02
अपक्ष : 02
जनसुराज्य : 01
शिवसेना : 01
वंचित : 00
भाजपा.00