दोन्ही बंधूंच्या विजयानंतर रितेश देखमुखने केलं भावनिक ट्विट

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा सभा निवडणुकीत लातूरमधील काँग्रेसचे दोन्ही उमेदवार बंधूंचा जोरदार विजय झाला आहे. लातूरमधून अमित देशमुख यांनी 42 हजारांपेक्षा जास्त मतं घेऊन विजय मिळवला. तर लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख 1 लाख 20 हजारांएवढ्या विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. दरम्यान, दोन्ही बंधूंच्या या विक्रमी विजयानंतर त्यांचा तिसरा भाऊ अभिनेता रितेश देखमुखने एक भावनिक ट्विट केलं आहे.

रितेशन विलारावांची आठवण काढून एक भावनिक ट्विट केलंय. “पापा, आम्ही करून दाखवलं, PAPA We did it असं लिहून रितेशने दोन्ही भावांच्या मतांच्या विजयाची आकडेवारी जाहीर केलीय. त्यासोबतच, लातूरमधील जनतेचे आभार मानले आहेत. आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि श्रद्धेबद्दल आपले आभार असे”, असं रितेशने म्हंटल आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.