मुक्ताईनगर: माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या व मुक्ताईनगर मतदार संघातील भाजप उमेदवार अॅड. रोहिणी खडसे यांचा राष्ट्रवादी पुरस्कृत बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी १९८७ मतांनी पराभव केला आहे आहे. शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर मुक्ताईनगरात राष्ट्रवादी व चंद्रकांत पाटील समर्थकांनी एकच जल्लोष सुरु केला आहे.
भाजपाने एकनाथ खडसें यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले की मुक्ताईनगर हा मतदार संघ भाजप ला मानणारा कमी आणि नाथा भाऊला अधिक मानणारा आहे. त्यामुळे या संदर्भात विचार करून तिकीट द्यायला हवे, परंतु तरीही पक्षाने रोहिणी खडसे याना तिकीट दिले त्यानंतर कार्यकर्त्यांनी देखील पर्यत्न केले परंतु थोड्या मतांनी रोहिणी यानाचा पराभव झाला आहे.
तसेच शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे छुपे समर्थन होते, कारण शिवसेनेनं अद्याप पर्यंत बंडखोरावर काहीच कारवाई केली नसल्यचा आरोप खडसे यांनी केला आहे.
दरम्यान आजच्या निकालावेळी खडसे कन्या 500-1000 मतांच्या फरकाने पुढे मागे जात होत्या. मात्र, अखेर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळविला आहे. रोहिणी खडसे यांचा पराभव हा एकनाथ खडसेंसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.