पुणे : राज्यात आज विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे. पुणे आणि पुणे जिल्ह्यातदेखील दिग्गज नेत्यांचे भविष्य आज मतदार ठरवणार आहेत. त्यातच महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या प्रवक्त्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला.
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील शिवाजीनगरच्या विद्या भवन शाळा येथे मतदान केले. तसेच त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री श्रीमती लतिका गोऱ्हे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. गोऱ्हे यांनी विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केले.