दिलखुलासपणे विद्यार्थ्यांना हर्षवर्धन पाटलांची उत्तरे
पुणे : स्पर्धा परीक्षेमध्ये इंदापूर तालुक्यातील सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्ध्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर मेहनतीने परीक्षा ट्रेक करता आली पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पाटील यांनी केले.
पत्रकार भवन येथे युवा संवाद या कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील तरुणांनी प्रशासकीय सेवेत येण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, यासाठी पुणे शहरामध्ये एक वेगळा इंदापूर पॅटर्न तयार केला जाईल. माझ्या संस्थेची अर्धा एकर जागा असून, त्या जागेमध्ये हे अद्ययावत वसतिगृह पुढील नजीकच्या काळात बांधण्यात येईल. त्यामध्ये 200 ते 300 विद्यार्थ्यांची राहण्याची अतिशय चांगली सोय निर्माण करण्यास मी कटिबद्ध असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.
त्याचबरोबर मला माहित आहे, की शहरांमध्ये आल्यानंतर भोजनाची राहण्याचे, अभ्यासिकेचे अनंत प्रश्न असतात त्यावर मात करण्यासाठी हे वस्तीगृह आम्ही बांधणार आहोत. त्याचबरोबर अद्ययावत अशी ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी अनेक किस्से संसदीय कामकाज मंत्री असताना किंवा इतर वेगवेगळ्या अठरा खात्याचे मंत्री म्हणून काम करत असताना आलेले अनुभव हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना प्रश्न विचारले या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे पाटील यांनी दिली.