#व्हिडिओ: पीएमसी बॅंक खातेधारकांचे मुंबईत कोर्टासमोर आंदोलन

मुंबई : पीएमसी बॅंक खातेधारकांनी मुंबईत किल्ला कोर्टच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत राकेश वाधवान याचे वकील अमित देसाई यांच्या कारसमोर आंदोलन केले. बँकेच्या संतप्त ग्राहकांनी वरियम सिंग चोर है, पीएमसी बँक चोर है आणि आरबीआय चोर है अशा घोषणा देऊन कोर्टाबाहेर रास्ता रोको केला आहे. यावेळी आरोपींना जामीन देऊ नये असे लिहिलेले फलक घेऊन आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते.

दरम्यान संतप्त जमावाने रस्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी निर्माण व्हायला लागली होती. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांची समजूत काढत वाहतूक कोंडी सोडवली. यावेळी एचडीआयलचे सारंग वाधवान यांच्या वकीलाच्या गाडीवर आंदोलनकर्त्यांनी लाथा मारत आणि पाण्याच्या बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला आहे.

एचडीआयलचे सारंग वाधवान, राकेश कुमार वाधवान आणि बँकेचे माजी संचालक वरियमसिंग यांना कोर्टाच्या मागील परिसरातून कोर्टात हजर करण्यात आले होते. या तिघांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.