पुणे – दिवाळीनिमित्त पुण्याहून राज्यातील इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी) प्रशासनाने जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दिवाळी सुरू होण्याच्या दोन दिवस आधी स्वारगेट, नव्याने होणारे वाकडेवाडी व पुणे स्टेशन बस स्थानक या मध्यवर्ती बस स्थानकांतून कोकण, विदर्भ व मराठवाड्यासाठी 120 जादा बसेस धावणार आहेत.
स्वारगेट येथून गुहागर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, महाड, श्रीवर्धन, गणपतीपुळे, सातारा, सांगली, कोल्हापूर तर वाकडेवाडी बस स्थानकातून मराठवाडा, खानदेश, विदर्भात बसेस सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रवाशांची संख्या वाढल्यास बससंख्या वाढवण्यात येणार असून बसेसच्या वेळापत्रकासाठी संबंधित आगाराशी संपर्क करण्याचे आवाहन एस.टी. प्रशासनाने केले आहे.