नवी दिल्ली : महाराष्ट्रास सह हरियाणात निवडणुकांचे बिगुल वाजले असून, अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील घडामोडींचा कमालीचा वेग आला आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने आपल्या पक्षात दोन खेळाडूंना प्रवेश दिला आहे.
दरम्यान, भाजपने लोकसभेला गौतम गंभीरला तिकीट दिले होते. तो निवडूनही आला आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणखी दोन खेळाडूंना तिकीट देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या खेळाडूंना कुठल्या मतदार संघातून उमेदवारी द्यायची याबद्दल भाजप सध्या चाचपणी करत असल्याची चर्चा आहे.
Delhi: Olympic Medallist Yogeshwar Dutt joins BJP (Bharatiya Janata Party), in presence of Haryana Bharatiya Janata Party (BJP) Chief Subhash Barala. pic.twitter.com/9cWmO4Vxe5
— ANI (@ANI) September 26, 2019
भारताचा ऑलम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तने गुरुवारी भाजपात प्रवेश केला आहे. योगेश्वरने आतापर्यंत कुस्ती विश्वामध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याच्या चरित्रावर कोणाताही डाग नाही. कोणत्याही वादामध्ये योगेश्वर अडकलेला नाही.याचंच फायदा घेण्यासाठी भाजपने त्याला पक्षात घेतले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Delhi: Former Indian Hockey captain Sandeep Singh joins BJP (Bharatiya Janata Party), in presence of Haryana Bharatiya Janata Party (BJP) Chief Subhash Barala. pic.twitter.com/PAPOiwIO3j
— ANI (@ANI) September 26, 2019
तसेच हरियाणात हॉकीची क्रेझ लक्षात घेऊन हॉकी संघाचा कर्णधार संदीप सिंगलाही भाजपाने पक्षात सामील करून घेतले आहे. संदीप भारतीय संघाचा कर्णधार असल्याने त्याला हरयाणामध्ये चांगला मान सन्मान आहे. त्यामुळे जर संदीप निवडणूकीसाठी उभा राहीला तर तो जिंकून येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपाने संदीपला आपल्या पक्षात जागा दिल्याचे म्हटले जात आहे.